राज्यातील दहावी, बारावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी आपल्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी निकालासंदर्भात महत्वाची अपडेट दिली आहे. यानुसार बारावीचा निकाल २५ मे रोजी दुपारी २ वाजता जाहीर केला जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) मार्च - एप्रिल २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षांचे निकाल अधिकृत वेबसाइटवर पाहता येणार आहेत.
बारावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम खालील लिंक वर क्लिक करा
HSC Result 2023: असा पाहा निकाल
स्टेप १) बारावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम खालिल लिंक वर क्लिक करा
स्टेप २) बारावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप ३) तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरा.
स्टेप ४) बारावीचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल